मत्स्य व्यवसाय महिला शेतकरी गटाकरिता मासळी विक्रीसाठी १२ लक्ष रुपयांच्या निधीतून फिरते वाहन उपलब्ध.

मत्स्य व्यवसाय महिला शेतकरी गटाकरिता मासळी विक्रीसाठी १२ लक्ष रुपयांच्या निधीतून फिरते वाहन उपलब्ध करून देण्यात आले असून शासनाने विदर्भातील निवडक जिल्ह्याकरिता ही योजना अंमलात आणली आहे.याअंतर्गत जुनोना येथील राधा मत्स्यव्यवसाय शेतकरी गट,अन्नपूर्णा शेतकरी मत्स्यव्यवसाय महिला शेतकरी गटाकरिता फिरते वाहन मंजूर झाले

असून नुकतेच त्याचे वितरण देखील करण्यात आले आहे.प्रस्तुत कार्यक्रमास सर्व भाजप पदाधिकारी,सहाय्यक आयुक्त व मत्स्यव्यवसायिक उपस्थित होते.महिला सशक्तीकरण व महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे ही भाजपची पूर्वापार नीती राहिली असून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सदैव प्रयत्न राहतील

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on मत्स्य व्यवसाय महिला शेतकरी गटाकरिता मासळी विक्रीसाठी १२ लक्ष रुपयांच्या निधीतून फिरते वाहन उपलब्ध.