१० लक्ष रुपयांच्या निधीतून कांढली सर्कल येथे खडीकरण व गावांतर्गत रस्त्याचे बांधकाम.

१० लक्ष रुपयांच्या निधीतून कांढली सर्कल येथे खडीकरण व गावांतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.सदर विकासकामांचे भूमिपूजन ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले.ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळावी म्हणून सदर विकासकामे राबविण्यात येत आहे.तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा अंतर्गत हिंगणघाट

मतदारसंघात मौजा उमरी येथे महागाव रस्त्यांना जोडणारा रत्नमाला देवस्थान पर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येत आहे.या विकास कामासाठी सुमारे १२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच रस्ते बांधकामामुळे स्थानिक नागरिकांची दळणवळण व वाहतुकीची समस्या कायमची दूर होणार आहे.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on १० लक्ष रुपयांच्या निधीतून कांढली सर्कल येथे खडीकरण व गावांतर्गत रस्त्याचे बांधकाम.