समाधान शिबीर

माझ्या मतदारसंघातील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हेच माझे कर्तव्य समजतो व त्यानुसार आजपर्यंत सर्व कामे केली. शक्य तितकी विकासकामे पूर्ण व्हावी याकडेच कल होता व कायम असेल. याच अनुषंगाने मतदारसंघात विविध उपक्रम राबविली, महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात आलेले समाधान शिबीर त्यापैकीच एक . यात स्थानिकांना महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल विस्तृत माहिती देण्यात  आली, लोकहितार्थ अनेक योजनांची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली, गरजूंना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ देखील झाला.