नाव- श्री.समीर त्र्यंबकराव कुणावार

पद – आमदार,हिंगणघाट/समुद्रपूर/सिंदी(रे.) विधानसभा क्षेत्र

पक्ष- भारतीय जनता पार्टी

आवड- सामाजिक कार्य, लोकं जोडणे, त्यांच्या सुख दुख:त सहभागी होणे.

राजकीय वाटचाल

१९९६ मध्ये विदर्भातील सर्वात मोठी धान्याची बाजारपेठ असलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या संचालकपदी नियुक्ती.

१९९८ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी नियुक्ती.सहकार क्षेत्र उल्लखनीय काम.

२००१ मध्ये हिंगणघाट नगर परिषदेमध्ये जनतेतून थेट नगराध्यक्ष म्हणून निवड.

तब्बल ३ वर्षे लोकप्रिय नगराध्यक्ष म्हणून जनतेची सेवा. याशिवाय भ्रष्टाचारमुक्त नगरपरिषद चालवून राजकीय क्षेत्रात आदर्श निर्माण केला.

उत्कृष्ट नगराध्यक्ष पुरस्काराने गौरवान्वित.

वर्ष २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवून प्रथम क्रमांकाची ९० हजार २७५ मते प्राप्त करून तब्बल ६५ हजार २७५ मतांनी दणदणीत विजय मिळवून लोकनियुक्त आमदार म्हणून हिंगणघाट/समुद्रपूर/सिंदी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व.

सामाजिक कार्य

१९८४ ते १९९० स्वयंसेवक म्हणून सामाजिक कार्य

गोसेवा (गौरक्षण) :पैशा अभावी शेतकऱ्यांनी स्वत:जवळ गायी विकून पापाचे भागीदार होऊ नये तसेच गावराणी गायी वाचाव्यात म्हणून गौरक्षणाची निर्मिती.

समुद्रपूर तालुक्यातील कोरा सर्कल मधील पावनगावयेथे गौरक्षणाची स्थापना ,याठिकाणी आज १०० च्या वर गायी आहेत.गौरक्षण झाल्यामुळे सर्कलमधील कोणताही शेतकरी गाय कसायांना विकत नाही,  हे विशेष.

समुद्रपूर येथे गौरक्षण स्थापन करण्यात आले असून, या ठिकाणी एकूण ५० च्या वर गायी आहेत या गायींचे संगोपन केले जात आहेत.

२०१३ मध्ये हिंगणघाट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३५०० परिवार बाधित झाले तसेच अन्नधान्याची प्रचंड नासाळी झाली. अनेक कुटुंब बेघर झाले.प्रत्येक बाधित कुटुंबियांना एक महिना पुरेल एवढे ५ ट्रक धान्य, तेल व किरण वाटप.अनेक घरांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत केली.