मातोश्री आशाताई कुणावार आर्टस्, काॅमर्स व सायंन्स महीला महाविद्यालयाचे उदघाटन.

हिंगणघाटचे विद्या विकास शैक्षणिक संस्थेद्वारा संचालित मातोश्री आशाताई कुणावार आर्टस्, काॅमर्स व सायंन्स महीला महाविद्यालयाचे उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी उद्घाटनाचा मान मला मिळाला ही

माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मातोश्रींच्या नावाने असणाऱ्या या महाविद्यालयात अनेक मुलींचे भविष्य घडेल. अमूल्य मुल्यांची रुजवण करण्यात येईल. येथून शिकून मुली यशाची शिखर गाठतील. अशाप्रकारे मातोश्रींचे नाव जगात मोठे होईल. मुलींना आवश्यक सर्व सुविधा व उत्तम शिक्षणपद्धती उपलब्ध असणारे असे महाविद्यालय बनेल यात शंका नाही. संस्था अध्यक्ष पांडुरंग तुळसकर व सचिव डॉ उमेश तुळसकर यांच्या कार्य कौतुकास्पद आहे. माझ्याद्वारे या शुभकार्याची सुरुवात होत असल्याचा मला अत्यंत आनंद वाटतो आहे.