संजय गांधी निराधार योजने अंतर्गत २६८ लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप.

समुद्रपूर येथील तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार योजने अंतर्गत २६८ लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप केले. १) संजय गांधी निराधार अनुदान योजना २) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ३) इंदिरा

गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना ४) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना ५) इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन या विविध शासकीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून जवळपास ५ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिले आहे. याबरोबरच गावागावांमध्ये कार्यकर्त्यांचा माध्यमातून गरजवंताचा शोध घेत जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळून देण्याचा प्रयत्न करीत आहे.