समुद्रपूर नगरपंचायत अंतर्गत ५५ लक्ष रुपयांचा निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व वॉटर एटीएम लोकार्पण सोहळा.

समुद्रपूर नगरपंचायत अंतर्गत ५५ लक्ष रुपयांचा निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व वॉटर एटीएम लोकार्पण सोहळा तथा पंतप्रधान आवास योजना प्रारंभ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.यात रस्ता अनुदान अंतर्गत सिमेंट क्रॉक्रीट

रस्ता बांधकाम व खडकीकरण,महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत सिमेंट क्रॉक्रीट पाईपलाईन बांधकाम करणे,नवीन नगरपंचायत सहाय्य योजनेअंतर्गत समुद्रपूर येथील आठवडी बाजार येथील पेव्हिंग ब्लॉक बसविणे,१४ व्या वित्त आयोगाअंतर्गत री वॉटर प्लांट वुईथ वॉटर एटीएम व शेडचे लोकार्पण करणे,प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १३८ लाभार्थ्यांना इमारत बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र वितरण,सेग्रीगेशन पारितोषिक वितरण(चांदीची नाणी,टी शर्ट,कॅप) करण्यात आले.नागरिकांना दैनंदिन सुविधांवर भर देण्यासोबत दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर शासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील विकास कामांना प्रारंभ करण्यात आला आहे.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on समुद्रपूर नगरपंचायत अंतर्गत ५५ लक्ष रुपयांचा निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व वॉटर एटीएम लोकार्पण सोहळा.