मजुरांनी शासनाच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा.

आज दिनांक ८ जानेवारी २०१९ रोजी शिवसुमन मंगल कार्यालय हिंगणघाट येथे आयोजित इमारत व इतर इमारत बांधकाम कामगार लाभार्थी मेळाव्यात इमारत बांधकाम कामगारांना बांधकाम उपयुक्त अवजारे खरेदी करण्याकरीता आर्थिक सहाय्य म्हणून

५ हजार रुपयाच्ये प्रमाणपत्र देऊ केले.ही रक्कम थेट कामगारांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच ७२१ कामगारांना ३६ लक्ष ५ हजार रूपयांचे अनुदान प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे आणि मला विश्वास आहे कि,जास्तीत जास्त कामगार शासनाच्या योजनांचा लाभ घेतील.