महाराष्ट्र दिनाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात ध्वजवंदन.

आज दि.१ मे २०१९ रोजी महाराष्ट्र दिनाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात ध्वजवंदन करण्यात आले.प्रसंगी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. अनेक वर्षानंतर अधिकाधिक

देशांतले कामगार १ मे दीनाच्या सोहळ्यात सामील होत गेले आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिन साजरा करु लागले. १ मे दिवस आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिवसात होऊ लागला. १ मे दिवस ही सगळ्या कामगार चळवळीची परंपरा झाली. १९०५ च्या १ मे या दिवसासाठी लेनिनने लिहिलेल्या पत्रकात म्हटले होते, “कामगाराकामगारात, राष्ट्राराष्ट्रात, धर्माधर्मात असणारे शत्रुत्व नष्ट करा. या शत्रुत्वाने फक्त लुटारूंचा आणि जुलूमशहांचाच फायदा होतो, कारण ते कामगारवर्गातील अज्ञातावर आणि दुफळीवरच जगत असतात. ज्यू आणि ख्रिश्चन, फिन आणि स्वीडश, आर्मेनियन आणि तातार, पोलिश आणि रशियन, ल्याटिन आणि जर्मन सारे भेदभाव विसरून समाजवादाच्या एका झेंडयाखाली आपण सारे आगेकूच करूया. सर्व देशातील कामगारांची ही ऐक्यशक्ती, आंतरराष्ट्रीय समाजवादाची संघशक्ती, १ मे दिनाला आपल्या दलांची पाहणी करते आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यासाठीचा लढा निर्धाराने आणि अविचलपणे पुढे नेण्यासाठी आपले बल संघटीत करते.”

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on महाराष्ट्र दिनाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात ध्वजवंदन.