“स्वर्ग रथ” तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 10 घंटागाडी आणि 6 ट्रेक्टर ट्राॅलीचे लोकार्पण.

दिनांक 31/07/2018 ला मा. आमदार श्री समीरभाऊ यांच्या निधि अंतर्गत रुपये 14 लक्ष मधून “स्वर्ग रथ” तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 10 घंटागाडी आणि 6 ट्रेक्टर ट्राॅलीचे लोकार्पण सोहळा दुपारी 1.00 वाजता नगर परिषद येथे मा.

आमदार समीर कुणावार – यांचे शुभ हस्ते तथा मा.नगराध्यक्ष प्रेम बसंतानी – यांच्या अध्यक्षतेखाली मा. चंद्रकांत मावळे सभापती बांधकाम क्मा. नरेश युवनाथे सभापती स्वास्थ व भाजपा शहराध्यक्ष आशिष पर्बत यांच्या उपस्थितीत सम्पन्न झाला.यावेळी मार्गदर्शन उपस्थितांना मार्गदर्शन करीत आमदार समीरभाऊ कुणावार यांनी सांगितले की हिंगणघाट शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी ते कटीबद्ध असून येत्या काही दिवसात विशेष निधी अंतर्गत शहरातील महत्वाच्या ठिकाणी कामे सुरू होणार असून निश्र्चितच शहरांचा चेहरामोहरा बदलणार आहे आज पासून स्वर्गरथ नगरपरिषद सेवेत रुजू झाला असून आज या गाडीचे लोकार्पणा करत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला पाणी पुरवठा सभापती राहुल सोरटे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अंकुश ठाकूर, नगरसेवक सोनू गवळी,दादा देशकरी,राजू कामडी,प्यारुभाई कुरेशी, निलेश पोगले,मनोज वरघणे,देवा कुबडे,नगरसेविका छाया सातपुते,निता धोबे, रश्मी पर्बत, शुभांगी डोंगरे, वैशाली सुरकार, सुनिता मावळे, अर्चना जोशी,रविला आखाडे, धनश्री वरघणे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अनिता माळवे,कौसर अंजुम,रागिनी शेंडे,माधवी नरड,शोभा बैसवारे,माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार,माजी नगरसेवक किरण भाऊ वैद्य, अॅड.रवी मद्दलवार अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बिस्मिल्ला खान, दिनेश वर्मा, राकेश शर्मा, अनिल गहरवार,नानू करवा, नगरसेवक प्रकाश राऊत, नगर परिषद हिंगणघाट चे अभियंता संजय मानकर,अली, नासरे, कर्मचारी वर्ग अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on “स्वर्ग रथ” तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 10 घंटागाडी आणि 6 ट्रेक्टर ट्राॅलीचे लोकार्पण.