हिंगणघाट सेफ सिटी सर्वेलन्स प्रोजेक्ट

हिंगणघाट सेफ सिटी सर्वेलन्स प्रोजेक्ट अंतर्गत हिंगणघाट शहरातील नागरिकांच्या सुरक्षेकरीता महत्त्वपूर्ण चौकात सी.सी.टी.व्ही.(CCTV) कॅमेरे लावण्याचा प्रकल्पाचा शुभारंभ आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते व पोलीस अधीक्षक निर्मलादेवी

एस.मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पोलिस अधीक्षक निर्मलादेवी म्हणल्या की आमदार समीरभाऊ कुणावार सारखे लोकप्रतिनिधी या शहरांचे नेतृत्व करीत असून हे या शहरांचे भाग्य असून त्यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करत हा प्रकल्प मंजूर करून घेतल्याचे तसेच त्यांच्या सेवा कार्यकाळात कामाप्रती सतत पाठपुरावा करणारे समीरभाऊ कुणावार हे पहीले आमदार असल्याचे सांगितले हा प्रकल्प फक्त त्यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाल्याचे नमुद केले.या प्रसंगी नगराध्यक्ष प्रेमबाबू बंसतानी, उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी भिमराव टीळे, पोलिस निरीक्षक सत्यविर बंडीवार, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.